राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री तसेच अ. भा. महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. छगन भुजबळ यांना न्यायालयाने क्लीन चिट देऊन महाराष्ट्र सदनच्या कथिट घोटाळा प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली याबद्दल अमरावती येथील समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे रेल्वे स्टेशन चौकातील खारकर कॉम्प्लेक्स समोर फटाके फोडून तसेच नारे लावून जल्लोष केला.याप्रसंगी समता परिषदेचे प्रदेश सचिव तथा माजी उपमहापौर डॉ. गणेश खारकर, प्रदेश सदस्य ऍड. बाबुराव बेलसरे,महानगर अध्यक्ष अशोक दहीकर, जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर लेकुरवाळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ऍड.प्रभाकर वानखडे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष राजाभाऊ चिंचमलादपुरे, जेष्ठ कार्यकर्ते अब्दुल जमीर,राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष वाहिद खान,उपाध्यक्ष अब्दुल जमीर,दिलबर शाह, शकूर बेग, शेख नाजीम, सुधीर इंगळे, प्रकाश वाळशे, अण्णा कुंबालकर, राजु आजनकर, अमोल शेंडे, राजु हिवसे, जावेद भाई, हरिदास विठोळे, राजु गुलवाडे, चेतन मानकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ना. छगन भुजबळ यांना न्यायालयाने निर्दोष घोषित केले याबद्दल अमरावती मध्ये समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जल्लोष...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी