राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील नामवंताचा सत्कार..


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बबनरावजी घोलप  माजी समाज कल्याण मंत्री यांच्या आदेशानुसार व राज्य उपाध्यक्ष दादासाहेब काटकर आणि अमरावती विभागीय अध्यक्ष मा. प्रा. डि. आर. माळी सर यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक  "27 सप्टेंबर 2021" , रविवार रोजी "राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा 27 वा वर्धापन दिन"  बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव (जामोद) येथे कोरोनाच्या नियमांचे पालन करुन रविदास महाराज जयंती उत्सव स्थळ ,रामदेव नगर,जळगांव (जामोद) येथे वृक्षारोपण करून कार्यक्रमा शिवाय विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे समाज बांधव यामध्ये राजीव वाढे - उत्कृष्ट पत्रकार - ईलेक्ट्रॉनिक मिडिया,विजयजी तांदळे -यशस्वी उद्योजक,श्रीकृष्णजी भटकर - आदर्श शिक्षक व शाळा ISO मानंकन प्राप्त. प्रा गजाननराव दांडगे सर- अष्टपैलू प्राचार्य,रवींद्रजी शेकोकार - कोरोना योद्धा आरोग्य विभाग,अॅड रविंद्र काकडे - कुशल विधी सल्लागार,ज्ञानदेवराव घोपे- प्रगतीशिल शेतकरी,अरुण निंबोळकर- माजी सैनिक, रामदास पिंजरकर - विशेष संपर्क व संघटन कौशल्य,सुखदेवराव थोटे प्रभावी सुत्रसंचालक,दयाराम कुसुंबे - उत्कृष्ट सेवा पोलीस विभाग,योगेश निंबोळकर -  कोरोना योद्धा , पोलीस विभाग यांचा गुरू रविदास महाराज प्रतिमा, राष्ट्रीय चर्मकार महासंघ भुमिका - पुस्तिका, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी गुरू रविदास महाराज जयंती उत्सव समिती अध्यक्ष पांडुरंग गवई, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव इंगळे,  युवा आघाडी जिल्हा सचिव संदिप इंगळे,  व कर्मचारी आघाडी तालुका अध्यक्ष शिवहरी रोजतकार,तालुका अध्यक्ष गजानन माटे, तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव घोपे,  शहर अध्यक्ष नागेश भटकर  ,माजी तालुका अध्यक्ष प्रमोद रोजतकार, गणेश डामरे, महादेवराव घोपे , से. नि उपायुक्त , विठ्ठलराव सावळे,अनंता माठे,शंकर घोपे,महादेव माटे,लक्ष्मण घोपे, समाधान वानेरे, ,अभिनव इंगळे, प्रवीण भटकर आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होते.

Previous Post Next Post