आझाद हिंद संघटनेच्या वतीने मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या मार्फत मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस हे २० वर्षापासून जिल्हा परिषद व खाजगी शाळा वर काम करत आहे ३० रुपये ते ५०रुपये मानधन मिळतो आणि कोरोना काळामध्ये ते सुद्धा वेळेवर मिळत नाही याकरिता त्यांचे मानधन दर महिन्याच्या ५ तारखेला देण्यात यावे. मयत झालेले शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे विमा पॉलिसी तात्काळ देण्यात यावे.जिल्हा परिषद व खाजगी शाळांमध्ये सफाई कर्मचारी नसल्यामुळे त्यांचे कामे शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस यांना करावे लागते , स्वयंपाकी ६०वर्षाच्या वर झालेले आहे त्यांच्या जागेवर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला समाविष्ट करून घेण्यात यावे यासह इतर मागण्याचे निवेदन देण्यात आले तसेच स्वयंपाकी व शालेय पोषण आहार च्या सर्व लोकांना सेवेत रुजू करुन घ्यावे असे निवेदनात म्हटले आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस यांच्या मागण्याची पूर्तता करून लवकरात लवकर मान्य करण्यात यावी अशी मागणी आजाद हिंद शालेय पोषण आहार संघटना च्या वतीने करण्यात आलेली आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लियाकत खान,सईदभाई ,जाहिद खान,हजर होते
शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस यांना शासनाने सेवेत रुजू करुन घ्यावे*:- आझाद हिंद संघटनेची मागणी...
जळगांव जामोद प्रतिनिधी:-