अचलपूर अंजनगाव पोलिसांच्या कारवाईत रेशनचा गहु तांदुळ जप्त.३९ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

दिनांक 27 सप्टेंबर सोमवार रोजी ग्रामीण पोलीस अधिक्षच यांच्या आदेशावरून अंजनगाव येथे धान्याचा ट्रक पकडल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर अचलपूर पोलिसांच्या पथकाने परतवाडा शहरातील मुगलाईपुरा भागात एका गोदामावर धाड टाकली. येथे आढळून आलेल्या धान्यसाठ्याच्या कट्ट्यांवर केंद्र राज्य शासनाचे शासकीय लोगो दिसले होते. पोलिसांनी ते जप्त करुन गोदाम सील केले. अंजनगाव परतवाडा येथील संयुक्त कारवाईत एकूण ३९ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याप्रकरणी चौघांना अटक केली. आरोपींमध्ये मो. शाकीब मो शाहीद (३२, रा. बुधवारा सुर्जी), एजाज खान अजिज खान (रा.अजिजपुरा सुर्जी) मो जिया मो. युनूस (रा.कम्मोपुरा, सुर्जी) रशीद अशरफ टोपली (रा. ठाकूर कॉलनी परतवाडा) यांचा समावेश आहे २७ सप्टेंबर रोजी अंजनगाव सुर्जीतील पानअटाई भागातून तांदूळ व टेसोचालकांनी नामागोदाम पंचासमक्ष सील करण्यात आले केली असता, तो माल रेशनचा असल्याचे लक्षात आले. तेथून मो. शाकीब व एजाज खान यांना अटक करण्यात आली . तो तांदूळ मो. जिया मो. युनूस याचा असल्याचे सांगण्यात आल्याने त्यालाही अटक करण्यात आली माल ३८.९ ५ क्विंटल तांदूळ असा आठ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तो माल रशीद टोपलीला विकतो, अशी कबुली तिन्ही आरोपींनी दिल्यानंतर अंजनगाव सुर्जी व अचलपूर पोलिसांचे पथक परतवाड्यात पोहोचले. त्यांनी मुगलाईपुरा येथील रशीद  टोपलीच्या गोडाऊनवर धाड टाकून एफसीआयचा शिक्का असलेले २६८ क्विंटल तांदूळ, १० क्विंटल गहू व एक १८ चाकी ट्रक असा ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस निरीक्षक दीपक वानखडे अचलपूरचे ठाणेदार संतोष टाले यांच्या नेतृत्वात करण्यात आली अशी माहिती आज पोलिसाकडून देण्यात आली.

Previous Post Next Post