रुईखेड येथील आरोग्य उपकेंद्र वाऱ्यावर रिक्त पदामुळे एकाच आरोग्य सेवकावर चालतो कारभार...


राजु भास्करे/अकोला जिल्हा प्रतिनिधी 

आकोट तालुक्यातील प्राथमिक आरोग्य  केंद्र पोपटखेड अंतर्गत येत असलेल्या रुईखेड येथील आरोग्य उपकेंद्र वाऱ्यावर दिसत आहे याकडे आरोग्य विभागाचे साफ दुर्लक्ष दिसत असुन  दिनांक 31 जुलै 2021 पासुन या उपकेंद्रामध्ये आरोग्य सेविका अंशकालीन स्त्री परिचर व परिचर ही तीन  पदे रिक्त   आहेत तरीदेखील येथील रिक्त  असलेल्या जागा आरोग्य विभाग  का भरत नाही असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे रुईखेड येथील आरोग्य उपकेंद्राचा कारभार राम भरोसे पाहून या ठिकाणी आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार दिसत आहे पोपटखेड पी एस सी अंतर्गत येत असलेल्या या रुईखेड गावात आता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात  ठिक ठिकाणी सांडपाण्याचे डबके साचत असल्याने डासांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यामुळे अनेक रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे यामुळे मलेरिया टायपेड सह खोकला ताप  सर्दी मळमळ करणे अशा आजारांचा  नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे तरी पण या महत्त्वाच्या विषयाकडे आरोग्य विभागाने पाठ फिरवली असल्याचे दिसून येत असून या हलगर्जीपणा मुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे सद्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने अनेकांना सर्दी ताप खोकला ही सात सूरु असल्याने गोर गरीब नागरीकांना गावात सहकारी दवाखाना असतांना खाजगी दवाखान्याचा आधार द्यावा लागत असून  यामध्ये नागरीकांचा मोठ्या प्रमाणावर  खर्च होत  आहे  रुईखेड येथे आरोग्य उपकेंद्र असून सुद्धा हे आरोग्य उपकेंद्र शोभेची वस्तू दिसत असुन नागरीकांचा आरोग्य विभागा प्रती  नाराजीचा सुर निघत आहे उपकेंद्र असुन सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध नाही गरोदर मातेला कोणत्याही प्रकारची मदत कींवा वेळेत उपचार तसेच वेळेवर लसीकरण केले जात नाही रुईखेड सह अनेक गावे या उपकेंद्र अंतर्गत येतात आणी आदिवासी समाजातील नागरिक सुद्धा या ठीकाणी येवून परत जातात या उपकेंद्र अंतर्गत आदिवासी भाग सुद्धा येतो येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचे पदे रिक्त  असल्याने एकाच आरोग्य सेवकावर येथील कारभार चालत असल्याने या आरोग्य सेवकावर मोठ्या प्रमाणात ताण असल्याने या आरोग्य सेवकाची मोठ्या प्रमाणावर पायपीट होत आहे  वैद्यकीय अधिकारी  डॉक्टर नीलेश देवरे यांनी अनेकदा  वरिष्ठ अधिकारी यांना  पत्रव्यवहार केला आहे आणि लेखी पत्र अनेक वेळा देवुन सुद्धा  कुठल्याही प्रकारची दखल आरोग्य विभाग घेतांना दिसत नसल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आरोग्य  विभागाला केव्हा जाग येईल असा प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला आहे.

Previous Post Next Post