राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
मेळघाटमधील गांगरखेडाच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित होवुनही पेसाच्या पेचामुळे ग्रामसभेच्या शिक्कामोर्तबाशिवाय प्रस्ताव मंजुर होत नसल्याने आज सोमवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे. कोरोना महामारीने ग्रामसभा राज्यभरात कुठेही झाली नसताना चिखलदरा तालुक्यातील गांगरखेडा येथील ग्रामसभा पहीली ठरावी.चिखलदरा तालुक्यात अनुसुचित जमाती (एस.टी.) बहुल वस्ती क्षेत्र असल्याने मेळघाटात पंचायत एक्सटेन्शन ई शेड्युल एरीया (पेसा) कायदा लागु आहे. या भागातील सरपंचावर केवळ सदस्यांच्या ३ चतुर्थांश बहुमताने अविश्वास प्रस्तावाने सरपंचास पायउतार करता येत नाही. १० सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीतील मतदार संख्या १६३० आहे. त्यावेळी २५ टक्के किंवा किमान १०० गणपुर्तीची अट असल्याने गावकर्यांच्या उपस्थीतीत होणार्या ग्रामसभेत थेट जनतेतुन निवडुन आलेल्या नाना बुच्या बेठेकर सरपंचाचे भविष्य ठरेल.सदर्हु सरपंचावर फेबृृृृवारी २०२१ ला अविश्वास प्रस्ताव पारीत झाला होता पेसाच्या तरतुदीने ग्रामसभेच्या सम्मतीशिवाय प्रस्ताव सम्मत न झाल्याने सरपंचास अभय मिळाले होते. ग्रामसभेचा काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
** जिल्हाधिकारी पवनित कौर यानी ग्रामसभेचा आदेश पारीत केला असुन तहसिलदार माया माने यानी आज ग्रामसभा निश्चीत केली आहे. गटशिक्षणाधिकारी संदिप बोडखे अध्यासी अधिकारी तर रमेश मेश्राम विस्तार अधिकारी पंचायत समिती चिखलदरा ,बंडू घुगे, अनिल कोल्हे,शुभम ठाकरे,निलेश तालन यांची चमु नेमली आहे.
जिल्हा परिषद शाळा गांगरखेडा येथे मतदान पार पाडण्यात आले
एकुण नोंदनी : 261
झालेले मतदान : 231
अवैध मते 14
पारपडलेले मतदान
अविश्वास प्रस्तावाचे बाजूने मते 168
अविश्वास प्रस्तावाचे विरूध्द बाजूने मते 49
** केंद्रावर नेमलेली प्रतिनिधि
बबली बापूराव बेठेकर, मंगल विक्रम मोरले
** केंद्रावरील सहकार्य
सुरेंद्र हरिचंद्र ब्राम्हणे ग्रामपंचायत कर्मचारी, बबीता सुखराम बेठेकर पेसा मोबीलायजर
** मतदान केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य
पी एस आय युवराज उईके
ए एस आय संजय तायडे ,पवन सातपुते,रुपेश शिंगणे,करूणा काळे, श्रीराम काळे , अस्या प्रकारे गांगरखेडा येथे मतदान शांतेत पार पडले.
मा तहसीलदार माया माने यांच्या आदेश प्राप्त झाले त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालय गांगरखेडा येथील सरपंच विरूध्द अविश्वास मतदान केंद्रावर गावकरी गावातील पदाधिकारी व सर्व कर्मचारी यांच्या योग्य सहकार्याने मतदान सुरळित पार पडले
संदिप बोडखे अध्यास अधिकारी मतदान केंद्र गांगरखेडा