हिवरखेड मध्ये डेंगू रुग्णांत वाढ,सामाजीक कार्यातून शाहरुखलाला यांनी केली वेटाळात फवारणी,


हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड वार्ड क्र चार मधील इस्लामपुऱ्यात सर्वाधिक डेंगू रुग्नातं  वाढ झाली असून येथील अंगणवाडीत सुद्धा जाण्याचा मार्गात गटाराचे पाणी साचल्याने अंगणवाडी जाता येत नाही ,या दूषित पाण्यामुळे} या वार्डात आणखी डेंगू रुग्ण वाढत आहेत, ग्रामपंचायत मात्र या विषयाकडे दुर्लक्ष करत असून ग्रामपंचायतचे कारभारी डेंगू आजारात सापडल्याने आणि तेच जर सुरक्षित नाहीत तर काय गावाला सुरक्षित ठेवतील ही बाब येथील सामाजिक कार्यकर्ते शाहरुख लाला यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च करून फवारणी मशीन आणली आणि त्याच्या वार्डात फवारणी केली ,आपला वेटाळ डेंगू मुक्त करू या करीता त्यांनी दिनांक २६,२७ सप्टेंबरला डेंगू फवारणी करून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे,ग्रामपंचायत जवळून ज्या अपेक्षा आहेत ते नागरिक जागरूक होऊन स्वतः करत आहेत ,मग एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतचा काय उपयोग, वरिष्ठांनि या विषयाची दखल घ्यावी.

Previous Post Next Post