श्रावण जानोजी निंबाळकर वय ४५ वर्ष राहणार टाकळी हाट असे तडीपार करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. श्रावण हा इसम पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर खुनाचा, विनयभंग,दुखापत,दारू पिऊन धामधूम करणे आणि बलात्काराचे गुन्हे दाखल झालेले होते. त्याला न्यायालयाने बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा सुनावली आहे. तो इसम शरीरा विरुद्ध चे गुन्हे करण्यास निर्ढावलेला आहे. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे टाकळी हाट गावामध्ये तसेच जलंब पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या जीवितास धोका निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाली होती.त्याच्या गुन्हेगारी वृत्ती मध्ये बदल घडत नसल्याने त्याला बुलढाणा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी खामगांव यांनी एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.ही कारवाई बुलढाणा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत खामगाव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शन करण्यात आली..
जलंब पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारास जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार .बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत उपविभागीय दंडाधिकारी खामगाव यांनी काढले तडीपारीचे आदेश.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- सुरज देशमुख
