जळगाव जामोद तालुक्यातील छायाचित्रण व्यवसाया बरोबर सामाजिक योगदान देणाऱ्या तालुक्यातील तीन पत्रकाराना कलात्मक योगदान व सेवाभावी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या वेळी महाराष्ट्र व मध्यप्रदेश मधून आलेले दोन हजार छायाचित्रकराची उपस्थिती होती.दिनांक 26 सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाना या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भवानी मंदिर येथे संपन्न झालेल्या सोहळा मैत्रीचा क्षण आनंदाचा या उपक्रमा अंतर्गत जळगांव जामोद तालुक्यात छायाचित्रण (व्यावसायिक फोटोग्राफी)व्यवसाय सांभाळून जळगांव जामोद तालुक्यातील दै. मातृभूमीचे तालुका प्रतिनिधी अश्विन राजपूत यांनी पाणी फाऊंडेशन मध्ये सक्रिय सहभाग घेतल्या बद्दल, धानोरा महासिध्द येथील दै. लोकमत चे वार्ताहर ग्रामपंचायत सदस्य संदीप भोपळे यांनी कोरोना काळात ग्रामपंचायत ने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग घेतल्या बद्दल त्याच प्रमाणे न्यूज 24 मराठी चे प्रतिनिधी माणेगावचे उपसरपंच शिवाजी पाटील यांना गावांत सामाजिक उपक्रम राबविने आणि ग्रामपंचायत अविरोध केल्या बद्दल गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोहळा मैत्रीचा उपक्रमांतर्गत छायाचित्रण व्यवसायातील कलात्मक योगदान व सामाजिक सेवाभाव पुरस्काराने गौरव...
जळगाव जा.प्रतिनिधी:-
