जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम टाकळी खासा या गावाला जाणारा मुख्य रस्ता हा गेल्या अनेक दिवसांपासून खडीकरण झालेला आहे.परंतु मागील चार ते पाच महिन्यापासून या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.तसेच पावसाच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात चिकल होत असल्यामुळे ग्रामस्थांना दळणवळण करत असताना मोठा त्रास सहन करावा लागतो.हा रस्ता तात्काळ दुरुस्त व्हावा रस्त्याला पडलेले खड्डे भरण्यात यावेत याकरता ग्रामस्थांच्या वतीने पंधरा दिवसाच्या अगोदर संबंधित जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग जळगाव जामोद यांना निवेदन दिले होते.परंतु ग्रामस्थांच्या होत असलेल्या या त्रासाची संबंधित विभागाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज दिनांक 28 सप्टेंबरला शासनाचे लक्ष वेधण्यात करतात अक्षय भाऊ पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग जळगाव जामोद या कार्यालयासमोर भर पावसामध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन चालू केले होते परंतु आंदोलन चीघळु नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी दोन ते अडीच तासांनीच आंदोलनाची दखल घेत तात्काळ रस्त्याला पडलेले खड्डे भुजविण्या एटीएम चे टिप्पर पाठवून दिले.नंतर संबंधित आंदोलन करत्यांना लेखी स्वरूपात पत्र देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. लेखी पत्रानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी टाकळी खासा येथील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
भर पावसामध्ये टाकळी खासा ग्रामस्थांचा रस्त्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम कार्यालयाबाहेर ठिय्या...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
