जळगांव जा.प्रतिनिधी:-
आरोग्य विभागाचे परीक्षा दिनांक 25 सप्टेंबर व 26 सप्टेंबर गट व गट ड च्या 6000 पदासाठी भरती आयोजित केली होती सदर भरती साठी लाखो सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले सदर परीक्षा साठी खुल्या प्रवर्गासाठी ५२० रुपये व आरक्षीत वर्गासाठी २७० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते.सदर भरती प्रक्रिया घेण्यासाठी मे, न्यासा कमुनिकेशन प्रायव्हेट लिमीटेड यांची नेमणूक करण्यात आली होती यामध्ये कंपनीने ऑनलाइन अर्ज मागवणे, उमेदवारा कडून परीक्षा फी जमा करणे, प्रवेश पत्र देणे, परीक्षा स्थळाचे नेमणूक करणे, लेखी परीक्षा घेणे व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे करीता जबाबदारी कंपनीकडे होती परंतु सदर कंपनी मी कुठलेही जवाबदारी व्यवस्थितपणे पार पडलेली नाही परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचलेले विद्यार्थ्यांचे झालेल्या आर्थिक व मानसिक नुकसानीची भरपाई देण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख, तालुकाध्यक्ष परिक्षीत ठाकरे, शहराध्यक्ष उमेश येउल, भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा सरचिटणीस वैभव आढाव, भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कीर्तेश अग्रवाल , विठ्ठल गावंडे, प्रयाग फुसे, शाम टावरी, मयूर मुळतकर , ओम कपले , प्रणव ठाकरे,गौरव डोबे इत्यादींचा या वेळेस उपस्थित होते.
