हिवरखेड येथे विठ्ठल मंदिरात गुरुपुष्यअमृत निमित्त श्री गजानन महाराज पारायण सोहळा संपन्न,एकदिवसीय विजय ग्रँथाला भाविकांचा उत्तम्म प्रतिसाद,

हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड  विठ्ठलरुखमाई संस्थान मध्ये  बऱ्याच दिवसांनंतर  गुरुपुष्यअमृतयोग निमित्ताचे औचित्य साधुन श्री गजानन विजय ग्रँथाचे वाचन करण्यात आले, यापूर्वी  प्रथम पारायणाला संस्थान मध्ये गुरुपुष्यअमृतयोगा निमित्त दायमा महाराज यांनी प्रारंभ केला  होता तर दिनांक ३० सप्टेंबरच्या सकाळी मंदिरात ६ वे   गुरुपुष्यअमृत्योगाचे औचित्य साधून २१ अध्यायचे असलेले श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले ,सकाळी ९ वाजतापासून तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे पारायण करण्यात आले, कोरोनाचे निमय पाळून साध्या पद्धतीने पारायण पार पडले पारायनामध्ये  गावांतील भाविक महिला पुरुषांनी हजेरी लावली होती, पारायण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ह,भ, प,वाकोडे महाराज, संस्थांनचे शँकर देशमुख, सत्यदेव गिर्हे, नागपूरे गुरुजी, रमेश निमकर्डे, शंकर चव्हाण,संजय मानके,गजानन गिर्हे, संस्थानचे आधी सेवेकरी उपस्थित होते,

 

Previous Post Next Post