आदिवासी विकास विभागाअंतर्गत मेळघाटमध्ये मोहा बँक सुरू करण्यात आले आहे.या बँकेचे सावलीखेडा येथील संकलन केंद्रावरून 22 कट्टे मोहाची चोरी झाली असून चार चोर रंगेहात धारणी पोलिसांनी पकडले आहे.धारणीपासून 25 किलोमीटर दूर असलेल्या सावली खेडा येथील आश्रम शाळेमध्ये मोहा बँकेचे चे संकलन करण्यात आले होते. तिथून गावातीलच काही चोरट्यांनी मोहा चोरून नेल्याची तक्रार मातृभूमी जनवन विकास योजना समितीचे अध्यक्ष दयालसिंग गुलाबसिंग कासदेकर यांनी धारणी पोलीस स्टेशनला दिली होती. त्या अनुषंगाने धरणीची ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांनी तात्काळ धारणी पोलीस पथकाला सक्रिय करून सावली खेडा येथीलच राजपाल गुलाब सिंग कास्देकर, अनिल हरिश्चंद्र दारशिंबे,राजकुमार किसन जांभेकर,व सुरेश कुंजीलाल, सर्व राहनार सावली खेडा यांनी बारा क्विंटल मोहासह अटक करण्यात आली आहे.व पुढील तपास धाटणीचे ठाणेदार श्री. सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात बीट अंमलदार व त्यांचे चमु करीत आहे.
मोहा बँकेतून बारा क्विंटल मोहाची चोरी...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
