गैरसमजा मधून जात आहे शिवनी येथील शिक्षकाचा बळी. संपूर्ण शिवनी येथील गावकरी शिक्षकांच्या बाजूने..

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका हा तसा आदिवासी बहुल तालुका. हा तालुका नेहमीच काही ना काही कारणाने वादांमध्ये सापडलेला असतो. सध्या हा तालुका शिक्षकांच्या पार्टीमुळे वादांमध्ये सापडला आहे. संग्रामपूर तालुक्यातील शिवनी शाळेवर पार्टी झाल्याचे माहित पडले व या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी आमची टीम शिवणीला पोहोचली असता स्थानिक लोकांच्या चर्चेवरून असे लक्षात आले की सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारची पार्टी झाली नाही. शिवनी हे आदिवासी गाव आहे. तेथील लोकांचे मांसाहार हे मुख्य अन्न आहे. शाळेतील शिक्षक व शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस हे नेहमीच सोबत जेवण करतात. त्या दिवशीसुद्धा तसेच घडले शालेय पोषण आहार  स्वयंपाकी यांनी जेवण करण्यासाठी घरी मटणाची भाजी शिजवली व सोबत जेवण करण्याकरिता गजा सहित भाजी शाळेत आणली.तेवढ्यात एका वृत्त वाहिनीचे पत्रकार शाळेत आल्यामुळे सदर शाळेतील शिक्षक घाबरून गेले व संबंधित व्यक्तीला समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. घाबरून गेल्या मुळे झालेल्या गैरसमजातून सदर शाळेचे शिक्षक ठोंबरे यांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तेथील स्थानिक लोकांशी संपर्क केला असता शाळेतील शिक्षक ठोंबरे हे दहा वर्षापासून त्या शाळेत कार्यरत असून ते कधीही दारू पीत नाहीत, कुठल्याही प्रकारची पार्टी करत नाही, असे लक्षात आले .उलटपक्षी शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबवून गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न करत असल्याचे समजले. शालेय पोषण आहारा मध्ये पूरक आहारात आंबे ,जांभूळ, नारळ पाणी यासारखे पदार्थ देऊन कुपोषण होऊ नये यासाठी प्रयत्नरत प्रयत्न करतात. अशा शिक्षकांचा गैरसमजातून बळी जाऊ नये याकरिता समस्त गावकरी मंडळी शिक्षकांच्या बाजूने उभे असल्याचे निदर्शनात आले आहे. तसेच सर्व गावकऱ्यांनी शिक्षकांच्या बाजूने पंचायत समिती येथे जाऊन शिक्षकांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये याकरिता ३०० गावकऱ्याच्या सह्यांचे निवेदन दिले आहे.

Previous Post Next Post