अकोट उप विभागीय पोलीस अधिकारी पदी अकरा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर श्रीमती रितू खोकर रुजू...


 अकोट ता. प्रतिनिधी:-सय्यद शकिल.

पोलीस रेकॉर्ड नुसार अकोट शहर व उपविभाग अकोट अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत ची काही गावे अतिसंवेदनशील म्हणून पोलीस दप्तरी नोंद आहे .अशा या पोलीस उपविभागाचे एस. डी. पि. ओ. पद सोनवणे साहेबांपासून तब्बल अकरा महिने रिक्त होते.शेवटी अकरा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर त्या पदावर आय. पि. एस. दर्जाच्या महिला अधिकारी श्रीमती रितू खोकर मिळाल्या. रितू खोकर ह्या भारतीय पोलीस सेवेतील 2018च्या तुकडीमधील पोलीस अधिकारी आहेत. रितू खोकर ह्या हरियाणा राज्यातील पानिपत येथील असून त्यांनी कुरुक्षेत्र विश्वमहाविद्यालय मधून एम. एस्सी. गणित विषयात सुवर्ण पदक पटकाविले आहे.तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिहं यांनी त्यांच्या या यशाबद्दल सन्मानित केले होते. शेतकरी कौटुंबिक पार्शवभूमी असलेले रितू खोकर यांचे वडील ताराचंद व आई सुनीतादेवी हे दोघेही गावचे माजी सरपंच राहलेले आहेत. रितू खोकर यांनी यू. पि. एस. सी.2017च्या परीक्षेत त्यांनी 141 वी रँक मिळवली असून त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले होते.त्यांचे सातारा जिल्ह्यातील परिविक्षाधीन कालावधी पूर्ण होताच गृहविभागाने त्यांना अकोट येथील एस. डी. पि. ओ. पदावरनियुक्ती देण्यात आली आहे.आय. पि. एस. दर्जाच्या पोलीस अधिकारी अकोट उपविभागाला मिळाल्यामुळे विभागातील गुन्हेगारी, अवैध धंदे यावर निश्चितच आळा बसेल असे जनता च मत आहे.

Previous Post Next Post