सहा वर्षापूर्वी मतिमंद हरविलेला आईचा मुलगा परत मीळाला..


 अड़गांव बु।प्रतिनिधी:-पुरूषोत्तम निमकर्डे.

अकोट येथील राहणारा नज़िरूद्दीन ज़मीरोद्दीन हा मंतिमंत होता तो सहा वर्षापासून घरून काही न सांगता निघुन गेला त्यांचे नातेवाईकांनी त्याला शोधणयाकरिता पोलीसात तक्रार, वुत्तपत्रकामध्ये जाहिरात , गेल्या सहावर्षापासून शोधत सर्वेतोपरी प्रयत्न केले परंतु शोध लागला नाही.अड़गांव बु।। ता तेल्हारा येथे एक मतिमंद व्यक्ति दाढ़ी,केस वाढलेली कोणाशी काही न बोलता गेल्या पांच वर्षापासुन पावसाळा,उन्हाळा,हिवाळा विना अथंरुन चा बसस्टैंड वरील हॉटेल,खानावळ,मध्ये मागत होता तेच खावून उपजिवीका भागवित होता. त्यांचे नातेवाईकाला माहिती मिळाल्यानंतर मतीमंद व्यक्ति हा अकोट येथील निजामोद्दीन ज़मीरोद्दीन याचा भाऊ आहे व मतिमंद व्यक्तीचे नाव नजीरोद्दीन ज़मीरोद्दीन आहे व मतिमंद व्यक्तीचे नाव नजीरोद्दीन ज़मीरोद्दीन आहे मतिमंद व्यक्ति हा माझा भाऊ आहे ही ओळख देत होता परंतु मतिमंद व्यक्ति हा अड़गांव बु।। येथे पाँचवर्षापासुन राहत आहे अड़गांव बु।। चे पोलीस चौकी जमदार श्री. राउत साहेब यांनी त्यांचे नातेवाईकाला या मतिमंद व्यक्तीची आधी ओळख पटविल्यानंतरच तुम्ही घेऊन जाऊ शकता मतिमंद व्यक्तीच्या नातेवाईकाला प्रशन पडला बोलु शकत नाही पूर्णपणे मतिमंद आहे चहेरा ओळख आहे त्या नंतरही पोलिस आधी ओळख पटवा नंतर घेऊन जा नंतर नातेवाईक यांनी ही माहिती अड़गांव बु।। चे कर्तव्यदक्ष ग्रा.पं सदस्य मो.असलम आरिफ उल्ला यांनी दिली असलम उल्ला  यांनी श्री. राउत साहेब यांची भेट घेतली मतिमंद व्यक्तिची ओळख पटणयाची जबाबदारी घेतली मतिमंद व्यक्ति आधार कार्ड, पोलीस तक्रार, वुत्तपत्रातील जाहिरात सर्व पुरावे गोळा करून मतिमंद ओळख पटली व नंतर नातेवाईक व मो.असलम आरिफ उल्ला स्वत:हा रात्री 01:00 वाजता त्याचे घरी जावून त्याच्या आईला स्वधिन केले मतिमंद व्यक्ति मिळाल्यामुळे त्याचे परिवाराने मो.असलम आरिफ उल्ला कमरूद्दीन मोईनोद्दीन , मो.आकिल पटेल नगरसेवक न.प अकोट यांचे आभार मानले.

Previous Post Next Post