वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले राज्यपाल यांना विविध मागण्यांसाठी निवेदन....


बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.

वंचित बहुजन महिला आघाडी बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने  राज्यपाल यांना  दिनांक १५ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष विशाखा ताई सावंग यांच्या नेतृत्वामध्ये घाटाखालील खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर संपूर्ण तालुक्यामध्ये वंचित बहुजन महिला आघाडी च्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.गॅस सिलेंडर, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल यांच्यासह जीवनाश्यक वस्तू चे भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहेत त्यामुळे गरिबांचे जगणे असह्य झाले असल्याने शासनाचा आम्ही निषेध करतो यांच्यासह इतर मागण्यांचे सुद्धा निवेदन आपणास सादर कले आहे. वंचित बहुजन आघाडी च्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत 1)गॅस सिलेंडर, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल जीवनाश्यक जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करून नियंत्रणात आणण्याकरता योग्य ते निर्देश शासनाला द्यावेत. 2)अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतामधील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले व घराची पडझड झाली स्थळ निरीक्षण करून व चौकशी करून शेतकऱ्यांना व नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी.3) केशरी व पिवळे राशन कार्ड असून सुद्धा बऱ्याच ग्राहकांना राशन दिल्या जात नाही तरी पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारकांना राशन देण्याचे आदेश देण्यात यावे.4)निराधारांचे प्रलंबित असलेले मागील सहा महिन्यापासून चे मानधन त्वरित देण्यात यावे.5)महाराष्ट्रामध्ये महिलांवरील वाढत चाललेले अत्याचाराचे प्रमाण बंद करण्यासाठी योग्य ते पाऊल शासनाने उचलावे व बलात्कारित  सर्व गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी.इत्यादी मागण्या होत्या वरील निवेदन देण्यासाठी खामगाव मध्ये वंचित बहुजन आघाडी चे ज्येष्ठ नेते शरद भाऊ वसतकार, जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ चौकसे, महिला जिल्हाध्यक्ष विशाखा ताई सावंग, जिल्हा महासचिव अँड-अनिल भाऊ ईखारे, तालुकाध्यक्ष नीलिमा ताई हॅलोडे, जिल्हा सदस्य वेणूताई सोनवणे, रेखाताई हिवराळे, पुष्पाताई हिवराळे, किरण ताई कळसकार, सारसर ताई , शहराध्यक्ष धम्मा भाऊ नितनवरे, भारत भाऊ हिवराळे व इतरही असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post