सामूहिक वनहक्क मिळालेल्या सोसोसखेडा गावाला नागपूर विभागीय आयुक्ताची भेट..


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धारणी तालुक्यातील सोसोखेडा गावाला वनहक्क अधिनियमांतर्गत सामूहिक वनहक्क  प्राप्त झाले आहे. सदर गावामध्ये गावातील नागरिकांनी सामूहिकरित्या एकजुटीने विविध उपक्रम राबविले आहेत.त्यामध्ये श्रमदानंतून पाच हजार वृक्षांची लागवड  व इतर कार्याची माहिती घेण्याकरिता नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त प्राजक्ता लावांगारे व चंद्रपूर च्या मुख्यकार्यपालन अधिकारी मिताली सेठी यांनी भेट दिली.मा. प्राजक्ता लावंगरे (IAS) विभागीय आयुक्त नागपूर (विदर्भ) आणि मा. मिताली सेठी (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर  यांनी दिले सोसोखेडा गावाला भेट.उपविभागीय अधिकारी कार्यालय धारणी, वन विभाग धारणी, समाज प्रगती सहयोग (SPS) आणि ग्रामसभा सोसोखेडा गावाने एकत्र येऊन सोसोखेडा गावाला मिळालेल्या सामुहिक वन हक्क क्षेत्रात १० हेक्टर मध्ये श्रमदानातून ५००० झाडं लावले त्या कामाची पाहणी करण्याकरिता मा. प्राजक्ता लावंगरे (IAS) विभागीय आयुक्त नागपूर (विदर्भ) आणि मा. मिताली सेठी (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर यांनी दिले सोसोखेडा गावाला भेट दिले. भेटी दरम्यान सामुहिक वन हक्क अंतर्गत वन खंड क्र. १२८८ मध्ये १० हेक्टर क्षेत्रात ५००० झाड गावकऱ्यांनी श्रमदानातून लावले. त्या क्षेत्राची पाहाणी करण्यात आली. तसेच २०२०- २१ मध्ये MGNREGA अंतर्गत ७५ हेक्टर क्षेत्रात झालेल्या DCT (विलग समतल चर) खोदलेल्या कामाची पाहणी करण्यात आली. तसेच त्यांचा हस्ते वुक्षरोपण सुद्धा करण्यात आले.आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा मागदर्शन ठेवण्यात आले. त्यामध्ये मा. प्राजक्ता लावंगरे मॅडम यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय धारणी, वन विभाग धारणी, समाज प्रगती सहयोग (SPS) आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन केलेल्या कामाची स्तुती केली असून या गावामध्ये झालेल्या कामाचा त्यांचा कार्यक्षेत्रात पुनरावलोकन करणार असल्याचे मत व्यक्त केले. तसेच गावकऱ्यांनी आसेच एकत्र राहून पुढील काम एकजुटीने करत राहावे असे सांगीतले.तसेच मा. मिताली सेठी यांनी कामाची स्तुती करून असेच एकजुटीने काम करत राहा. कधीही कुठलीही अडचण असल्यास मला कळवत जा, मी मदत करायला तयार आहे.  मी मेळघाट मधून गेलो तरी अजूनही मेळघाट मनात ठाम बसलेला आहे असे मत व्यक्त केले.त्यांचा सोबत तालुक्याची पूर्ण यंत्रणा मा. वैभव वाघमारे सर (IAS) प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धारणी, अतुल पाटोळे सर, तहसीलदार, धारणी, मा. महेश पाटील सर, गट विकास अधिकारी धारणी, मा. पुष्पा सातारकर मॅडम, वन परिक्षेत्र अधिकारी(RFO) धारणी. मा. विनोद धनगर सर, नियोजन अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) धारणी, संदिप सर, प्रकल्प समन्वयक प्रकल्प कार्यालय धारणी, जितेंद्र मोहोड सर, वन हक्क समन्वयक, SDO कार्यालय धारणी तसेच समाज प्रगती सहयोग (SPS) ची पूर्ण टीम उपस्थित होते.

Previous Post Next Post