वाशीम जिल्ह्यातून जांब गावातून शेतकरी आले मेळघाट ची विविध पिकांची वनशेती पाहायला आले असल्याने त्यांचे मेळघाटमधील शेतकऱ्यांनी स्वागत केले.वर्षभरातून 2.5 एकरात विहिरीच्या पाण्याचा सुयोग्य वापर करत 38-40 प्रकारची पिके घेणारे श्री मौजीलाल भिलावेकर रा मान्सुधावडी यांची कीर्ती पानी फौंडेशन च्या फिल्म मेकिंग टीम ने बनवलेल्या "पगार देणार शेत " या माध्यमातून तसेच विविध वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्या मधून सर्वदूर पसरली. त्यामुळे आज मान्सु धावडी त्यांचे शेत कृषी पर्यटनाचे ठिकाण झाले आहे..अमरावती, मोझरी, धामणगाव, वरुड, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, आष्टी, धारणी, चिखलदरा येथून 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भेटी दिल्या ची माहिती मौजीलाल भिलावेकर यांनी दिली.. वाशीम जिल्ह्यातील मंगरूळ पिर तालुक्यातील जांब हे गाव पानी फौंडेशन च्या समृद्ध गाव या उपक्रमात सहभागी आहे.. या गावातून सरपंच साहेबराव भगत , शरद चुंबके, संघपाल मनवर, गोपाळ भोंगळे, गजानन भगत, अमर भगत, शुद्धोधन भगत, संतोष अंभोरे, विश्वनाथ इंगळे, हे सर्व शेतकरी स्वखर्चाने मान्सुधावडी या गावाला आले होते..मौजीलाल यांचे शेतात खरीप मध्ये धान, मका, ज्वारी, अद्रक, हळद, तीळ, विविध भाजीपाला, बांधावरील लावलेली गवार , वाल, कारले, भोपळा, दोडकी, पपई, शेवगा, हादगा, आणि औषधी वनस्पती मध्ये सफेद मुसळी, गुळवेल, अडुळसा, पानफुटी भुईआवळा, अश्वगंधा, आणि बांधवरची वनशेती पाहून लोकांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले.. सुबाभूळ हे उत्पन्नाचे साधन कसे झाले? सुबाभूळ चे सर्व झाडे सात बारा वर नोंद असल्याने त्याचे लाकूड विक्रीतून पैसे मिळतात.. प्रत्येक शेतकरी हा अल्प भूधारक जरी असला तरी तो त्यांचे शेतीतून विविध पिकांची शेती आपल्या पाण्याचे नियोजन करत करू शकतो..कोरडवाहू शेतकरी हा वन शेती, फळझाडे हा पर्याय निवडून बारमाही "वनशेती पिके" घेऊ शकतो..यावेळी 'पगार देणारे शेत' या फिल्म साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेले, मौजीलाल भिलावेकर यांचे शेती चा अभ्यास करणारे धंनजय सायरे यांनी या सर्व शेतकऱ्यांची भेट घेतली. रोजगार हमी योजनेची जोड देऊन आपल्या गावात नर्सरी निर्माण करून बिहार पॅटर्न ची जोड शेतीच्या बांधावर करून 1 हेक्टर शेतीवर 400 + झाडे लावून 3 वर्ष 2 व्यक्तीला रोजगार मिळू शकतो. कोरडवाहू शेतकऱ्यांना वनशेती फळझाडे शेती चांगले उत्पन्नाचा स्रोत होऊ शकते. हे मौजीलाल भिलावेकर यांचे शेती च्या आधारे पटवून दिले.या वेळी जांब गावचे सरपंच श्री साहेबराव भगत यांनी रोजगार हमी अंतर्गत हे काम नक्की करू असे मत व्यक्त केले.. वाशीम जिल्ह्यातील मंगरूळ पिर तालुक्याचे समनव्यक सुभाष गवई आणि चिखलदरा तालुका समनव्यक वैभव नायसे हे यावेळी उपस्थित होते..
वासीम जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी केली मेळघाटमधील वनशेतीची पाहणी...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी