सलोना येथील गावतलावाला पडले मोठे भगदाळ...


 राजु भास्करे / अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

सलोना येथील गावतलावाला अचानक भगदाळ पडल्याने गावाकर्यानमध्ये भीती निर्माण झाली आहे.गावाला धोका असल्याची चिंता गावकर्यांनी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी सदर स्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.सलोना गावाला लागून च जि. प.लघुसिंचन विभागाचे     तलाव आहे. सदर तलावामध्ये सततधार पावसाने भरपूर पाणी असल्याने तलावाच्या मुख्य बांधावर दाब पडल्याने अचानक भगदाळ पडले आहे. तलाव फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे गावामध्ये दहशत पसरली आहे.हार्दिक तलाव केंव्हाही फुटू शकते. हे लक्षात येताच गावकर्यांनी संबधितजि प. लघुसिंचन विभागाचे  कनिष्ठ अभियंता पवार, व अभियंता रायबोले व उपविभागीय अभियंता मडावी यांना माहिती दिल्यावर या विभागाचे अधिकारी श्री मडावी यांच्यासह रायबोले व पवार यां अधिकाऱ्यांनी घटना स्थळी गावकर्यांसाह भेट देऊन पाहणी केली.व त्वरित उपायोजना करण्याच्या सुचना उपविभागीय अभियंता यांनी कर्मचाऱ्यांना दिल्याआहेत त्यानुसार लगेच त्यामध्ये टप्प्याटप्प्याने काळी माती भरून काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे माहिती उपविभागीय अभियंता एस.बि. मडावी यांनी दिली.

------------------------

*पाण्याच्या दाब बांधाच्या मध्यभागी पडल्याने मुरूम घसरून भगदाळ पडले त्यापासून धोका नाही. टप्प्याटयाने काळी माती भरून त्वरित दुरुस्त करण्यात येईल*

एस.बि.मडावी

उपविगभागीयअधिकरी, जलसंधारण जि. प. पाटबंधारे उपविभाग चिखलदरा

-----------------------

Previous Post Next Post