वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ
वरणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष कुमार आडसूळ यांनी दर्यापूर येथे जाऊन दर्यापूर गावातील हनुमान मंदिर येथे आगामी सण उत्सव, कायदा व सुव्यवस्था अबादीत राहावा या अनुषंगाने मिटिंग घेण्यात आली.सदर मिटिंग करिता प्रतिष्ठित नागरिक, सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,जैष्ठ नागरिक,दुर्गा उत्सव मंडळे हे उपस्थित होते.वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कुमार अडसूळ यांनी मार्गदर्शन केले व येणाऱ्या दुर्गा उत्सव हा शांततेने पार पाडावा व शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आव्हान केले याप्रसंगी दर्यापूर येथील पोलीस पाटील गिरीष पाटील,जी प सदस्य सरला कोळी,उपसरपंच मधुकर प्रधान,सदस्य अरविंद पाटील,Asi नरसिंग चव्हाण,Npc अतुल बोडदे,बीट अंमलदार,पोका राहुल येवले,पोका प्रशांत ठाकूर,गोपनीय विभाग इस्माईल शेख चालक व सर्व गावकरी उपस्थित होते
