धारणी येथील वसंतराव महावीद्यालयाच्या प्राद्यापकांनी महावीद्यालयीन विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेऊन कुटंगा तें सावलीखेडा प्रवास करून सदर मोहिमेचा सावलीखेडा येथे सांगता केली.कोरोना काळातील परिस्थिती पाहता शिक्षनापासून आदिवासी बांधव बरेच दूर गेल्याने बारावी नंतर कोणीही महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून दयाराम पटेल ट्रस्टच्या अध्यक्षा सौं विनाताई मालवीय व प्राचार्या सौं.डॉ.चित्रलेखा देशमुख यांच्या मार्गदर्शनात वसंतराव नाईक महावीद्यालय येथील प्राध्यापकांनी तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना व गावांना भेटी देऊन आदिवासी पालक व विध्यार्थ्यांच्या भेटी घेऊन शिक्षणाप्रति त्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर करून वेळेच्या आतकला वाणिज्य व विज्ञान शाखेत वसंतराव नाईक महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा असे आवाहन करण्यात आले.जनजागृती मोहिमेच्या अंतिम टप्प्यात दि.24.09.2021 रोजी राष्ट्रीय सेवा योजना वर्धापनदिनी एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी यांच्या नेतृत्वात सदर मोहीम राबविताना सावलीखेडा येथील कनिष्ठ महाविद्यालयात विध्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले.. सोबतच दाबीदा, सुसरदा, सादराबाडी,येथे प्रा. गणेश वैरागडे, डॉ. रमेश राठोड,प्रा. विकास देशमुख. व डॉ. संकेत मालवीय यांनी शिक्षणाचे महत्व व त्यासाठी असणारी प्रवेश प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती पटवून पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्याचे नम्रतापूर्वक आवाहन केले. व जनजागृती मोहिनमेची सांगता केली.
शिक्षण जनजागृती मोहिमेची सावलीखेडा येथे सांगता..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
