बोरिजवळ अज्ञात वाहणाच्या धडकेने अस्वलाच मृत्यू...


राजु भास्करे. /चिखलदरा.

मेळघाट मधील घटांग मार्गे सलोना वरून चिखलदराला जाताना बोरी गावाच्या जवळ अज्ञात वाहणाच्या धडकेने अस्वलीचा जगिच  मृत्यू झाल्याने परिसरातील लोकांनी तेथे पाहण्यासाठी गर्दी केली.मेळघाट व्याघ्र प्रकल्पच्या सीमा येथून जवळच असल्याने या परिसरामध्ये वन्य श्वापदांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. व चिखलदरा घटाँग मार्गे रस्त्यावर वाहणांची जास्त वर्दळ असते रात्रीच्या वेळी अस्वल रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहणाने धडक दिल्याने अस्वलीचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी गावातील लोकांनी  पाहण्याकरिता एकच गर्दी केली.वनविभागाला माहिती दिल्यावर त्वरित वनविभागाचे पथक येथून त्यांनी पंचनामा केला. व शवविच्छेदन करण्याकरिता आमझरी नर्सरीत नेऊन येथे अस्वलीचा मृतदेह नेऊन अग्नी देऊन अंतिम संस्कार केला.

Previous Post Next Post