चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत, येत असलेल्या, कुलगणा, गावातील, कुकूटपालन व्यवसाय, करणारे रामभाऊ गणपत खडके, वय ५५ वर्षे यांच्यावर त्यांच्याच चुलत भावाने, शेतीच्या वादावरून जीवघेणा हल्ला केलेला आहे, या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून, उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.चिखलदरा पोलीस स्टेशन यांच्या माहितीवरून, आरोपी, तानु मनुजी खडके , दादू मनोजी खडके, बलदेव मनुजी खडके राहणार, जनुना, व नागोराव मनुजी खडके, राहणार, कुलगणा, तालुका चिखलदरा,यांच्या विरोधात, चिखलदरा पोलीस स्टेशन, यांनी, कलम 324,/34 याप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले असून, आरोपीचा शोध घेणे सुरू होते,या घटनेचा तपास, ठाणेदार राहुल वाढवे, यांच्या मार्गदर्शनाखाली, पो,का, प्रभाकर चव्हाण करत असून आरोपीला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू होते,जखमी रामभाऊ खडके यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले,
शेतीच्या वादातून, रामभाऊ गणपत खडके, यांच्यावर जीवघेणा हमला,
राजु भास्करे /चिखलदरा