मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मुंबईला न येता आंदोलनाला घरूनच समर्थन द्यावे-- आ.डॉ.संजय कुटे यांचे आवाहन..


 जळगाव(जामोद)प्रतिनिधी:-

जळगाव जामोद मतदारसंघातील गेल्या वर्षीचा सोयाबीन पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी आपण वारंवार मागणी करून, निवेदने देऊन तसेच कृषिमंत्र्यांच्या दालनात बैठक घेऊन सुद्धा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. त्यामुळे आपण एक सप्टेंबर रोजी निर्धार व्यक्त केला होता की १५ सप्टेंबर पर्यंत हा प्रश्न मार्गी लागला नाही तर आपण आपल्या परिसरातील शेतकऱ्यांसह रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर आंदोलन उभारून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून देऊ. परंतु सध्याची कोरोणा सदृश्य परिस्थिती पाहता हजारो शेतकरी आपणासोबत आंदोलनाला येण्यास तयार असले तरी कोरोना सदृश्य परिस्थिती पाहता संबंधित शेतकऱ्यांना मुंबईसाठी आंदोलनस घेणे उचित ठरणार नाही. या मतदारसंघातील शेतकऱ्यांनीच आपणाला आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठविले, त्यामुळे त्यांचा प्रश्न निकाली काढणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. म्हणून ह्या सर्व शेतकऱ्यांना सोबत न नेता काही ठराविक शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपण १५ सप्टेंबर रोजी पिक विमा कंपनी आणि शासनाशी चर्चा करून शेतकऱ्यांची भक्कम बाजू त्यांच्या पुढे मांडू आणि आणि शेतकऱ्यांसाठी शासनाला पिक विमा कंपनीला ठोस भूमिका घेण्यासाठी बाध्य करू व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा मिळवून त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मुंबईला येतात माझ्या आंदोलनास घरूनच समर्थन व आशीर्वाद द्यावा असे आवाहन  भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे यांनी केले.शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देणे हे माझे आद्य कर्तव्य असून शेतकऱ्यांनी मुंबईला न येता तेथूनच माझ्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा व माझे आंदोलन यशस्वी होऊन पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांची खात्यात जमा होईल त्यासाठी माझ्या पाठीशी शक्ती उभी करून देऊन मला आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही यावेळी आमदार डॉ. संजय कुटे यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना केले आहे. मागील वर्षी कपाशी सोयाबीन सर्व पिके मातीमोल झाली असताना पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आतापर्यंत विविध पक्ष संघटनांनी पीकविमा मिळवण्यासाठी बरीच आंदोलने केली असली तरी त्याचे काहीही फलित झाले नाही. त्यामुळे आता या मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना हमखास पीक विम्याची रक्कम मिळेल, आ. डॉ.संजय कुटे यांच्या ह्या आंदोलनामुळे मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षा आता पल्लवित झाल्या आहेत.

Previous Post Next Post