गेल्या काही महिन्यांपासुन हजारो शेतकऱ्यांच्या तक्रारी एल्गार संघटने कड़े येत असुन पंतप्रधान सन्मान योजनेचे मदत म्हणून मिळणारे वार्षिक ६ हजार रुपये व त्याचे ३ हफ्ते गेली ६ महीने झाले बंद आहेत.खोलात जावुन चौकशी केली असता कळले की, महसूल विभाग व कृषि विभाग यांच्या मधील श्रेयाचा वाद असुन केंद्र सरकारने महसूल विभागाने केलेल्या कामाचे श्रेय कृषि विभागाला देऊन त्यांचा सत्कार केला. मुळात सन्मान योजनेचे पूर्ण काम महसूल विभागाने केल्याचे कळते ही बाब कोणाच्याही चूकीची असो त्याचा फटका मात्र शेतकरी वर्गाला बसत आहे.आधीच शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असून ही सहाय्यता मिळाल्यास थोडाफ़ार आधार मिळू शकतो त्यामुळे महसूल व कृषि विभागातील वाद तात्काळ मिटवून हा विषय मार्गी लावावा.अशी आग्रही मागणी एल्गार संघटना जळगाव जामोद च्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.पुढील १५ दिवसात या विषयावर तोडगा न निघाल्यास ५ ऑक्टोम्बर २०२१ ला एल्गार संघटना आक्रोश मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल असे एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांनी सांगितले. सदर निवेदनावर प्रसेनजीत पाटिल, विजय पोहनकर, अजहर देशमुख,बाळू पाटिल डिवरे,राजूबाप्पू देशमुख, दादाराव आटोळे,संजय देशमुख, रवि धुळे, ईरफान खान,आदित्य पाटिल, निजाम राज, अताउल्ला पठान, भागवत अवचार, मोहसिन खान, मोहजीर खान, आशिष वायझोड़े, सिद्धार्थ हेलोडे, सतिश तायड़े,इमरान खान, निखील पाथ्रीकर,अक्षय कोकाटे, वैभव कोकाटे,ईमरान दौला यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
पंतप्रधान सन्मान योजनेचा निधी तात्काळ वितरित करा* - एल्गार संघटनेची मागणी....
जळगांव जा.प्रतिनिधी:-
