धारणी तालुक्यातील चाकर्दा येथील बावीस वर्षाचा युवक संतोष रामलाल बेठेकर याना सतत ताप असल्याने सुरवातीला कुसुमकोट येथील दयासागर हॉस्पिटल व नंतर अमरावती येथील सुपर स्पेसिअलिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.अमरावती येथे डेंग्यू सदृश्य तापाने उपचारादरम्यान संतोषबेठेचे निधन झाले.त्यामुळे चाकरदा गावांत दहशत पसरली आहे.मेळघाटमध्ये कोरोनाचा कहर कमी झाल्यावर डेंग्यू व डेंग्यूसअदृश्य तापाने कहर केला आहे.गावोगावी या तपाचे रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असून सर्वत्र या आजाराची दहशत पसरली आहे.एक दिवस ताप येतो अन त्यामध्ये दररोज वाढ होतें व झपाट्याने शरीरातील प्लेटलेट्स पेशी कमी होतात. त्यामध्ये रुग्णाची प्रकृती खालवते व लगेच दोन तें तीन दिवसात रुग्ण दगावत आहे. संतोष यांना ही सतत ताप असल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली व परिणामी त्याचा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
चाकरदा येथे डेंगू सदृश्य तापाने युवकाचा मृत्यू..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
