राजु भास्करे /अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोट येथून जवळच असलेल्या खटकाली गावाजवळ एका पठार नदीमध्ये अकोट येथील इफ्तेखार प्लॉटमधील राहणारे दोन युवक हे पठार नदीच्या डोहात पोहण्यासाठी गेले त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शेख मोईन शेख अमीन 19, शेख सुफियान शेख हमीद 18 दोघेही रा. ईफ्तेखार फ्लाॅट अकोट अशी त्यांची नावे आहेत. ते दुपारी खटकाली परिसरातील पठार नदीच्या डोहातील नदीपात्रात पोहण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न समजल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी बघण्याची गर्दी झाली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
