सिंदखेडराजा येथे दिनांक 26 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा पार पडला .या कार्यक्रमात महामानवांचे प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून ढोल-ताशांच्या व फटाक्यांची आतिषबाजी मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पायदळ भव्य रॅली काढण्यात आली .यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष सौ सविता ताई मुंडे यांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला तर जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रॅली ला सुरुवात केली .त्यानंतर रॅली चे रूपांतर सभेमध्ये झाले .गवळी मार्गदर्शन करतांना वंचित च्या महिला प्रदेश उपाध्यक्ष सविताताई मुंडे यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेण्याचे आवाहन केले .व्यासपीठावर वंचित चे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव प्रशांत वागोदे जिल्हा नेते बाळाभाऊ राऊत विद्याधर गवई सह बालुभाऊ म्हस्के सह विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले व्यासपीठावर उपस्थित शंकरभाउ मलवार लक्षमन गवई ब्रम्हा पाडमुख अरुण काकडे शेख जमिर भाई रवि आघाव किशोर पाडमुख अशोक खरात संदिप आखाडे महेंद्र सोनवणे दिलीप राठोड संघपाल पनाड महेंद्र पनाड बळिभाऊ मोरे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे मुख्य आयोजन वंचित बहुजन आघाडी सिंदखेडराजा तालुका कार्यकारिणी सह विजय काकडे साहेब मेजर अनिल खरात सर प्रकाश दादा खरात मेजर अनिल ससाने प्रा.काकडे सर अमोल साळवे अमोल गवई विठ्ठल सोनकांबळे अॅड प्रदिप सोनकांबळे मधुकर खरात केवल नाईक संतोष साळवे संतोष मोरे रामेश्वर सोनकांबळे अमोल मोरे अभिमान ससाने सरपंच संपत ससाने प्रदिप मोरे खाडे दादा शिवाजी शिंदे भास्कर शिंदे साहेबराव साळवे डिके खरात संजय सोनकांबळे सिताराम जाधव सह वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थित महिला सह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते कार्यकमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन ता उपाध्यक्ष मधुकर साळवे यांनी केले आभार प्रदर्शन मा.ता अध्यक्ष बालुभाऊ म्हस्के यांनी केले.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे ... वंचित च्या नेत्या - - सविताई मुंढे.सिंदखेडराजा येथे वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा !
सचिन खंडारे/सिंदखेडराजा
