रताळी येथे युनिसेफ महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना बद्दल जनजागृती कार्यक्रम संपन्न..


 सिंदखेड राजा/ सचिन खंडारे.

तालुक्यातील रताळी येथे दिनांक 26/09/2021 रोजी युनिसेफ  महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंचालीत साधन केंद्र साखरखेर्डा  अंतर्गत व राताळी ग्रामपंचायतच्या सहकार्यीने राताळी या गावामध्ये  कोवीड-19 जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रम साठी अध्यक्ष स्थानी  राताळी येथील सरपंच सौ.अलका लव्हाळे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे ग्रामसेवक  रतिलाल ठाकुर होते व गावातील जवळपास 700 लोकांनी हे डोस घेतल्याची माहिती सरपंच सौ.अलका लव्हाळे यांनी दिली . तसेच  कोरोना मूळे महिलेचे  व पतीचे निधन झालेअसेल तर लोकसंचालीत साधन केंद्र साखरखेर्डा येथे नोंद करावी. अनाथ मुले असतील तर त्यांचा  साठीही मदत करू असे सांगण्यात आले .हि माहिती व्यवस्थापक आशा सरकटे मँडम यांनी दिली.उपस्थितीत.वैशाली परसणेलँलीवुट सययोगिनी.जी आय.डी सहयोगीनी गोदावरी इंगळे.फिल्ड सहयोगीनी रेखा पवार. व आशा राजगुरू. राताळी गाव प्रतिनिधी पुष्पा सरकटे. युनिसेफ सी आर पी ज्योती जाधव. राताळी येथील बचत गट अध्यक्ष व सदस्य बचत गट प्रज्ञा शिल करूना बचतगट मायावती बचतगट.कृष्णाई बचत गट, माया रमाई बचतगट, राजलक्ष्मी  बचतगट, एकलव्य बचत गट, तेजस्विनी बचतगट,  विठु माऊली बचतगट, जिजाऊ महिला बचत गटाच्या परतिनिधी हजर होत्या. यावेळी गावातून जनजागृती करण्यात आली व सर्व महिलांनी प्रभातफेरी. नारे देऊन कोरोनापासुन वाचन्यासाठी जनजागृती केली. कार्यक्रम नियोजन रेखा पवार व ज्योती जाधव यांनी केले. व यासाठी राताळी ग्रामपंचायतचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन  रेखा पवार यांनी केले.

Previous Post Next Post