बी एस पटेल महाविद्यालयाने कोकण व पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्तांसाठी काढली मदतफेरी...


 पिंपळगाव काळे प्रतिनिधी:-मंगल काकडे.

जळगांव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील स्थानिक बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव काळे यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम बापूमिया पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे सहसचिव रब्बानी देशमुख प्राचार्य डॉ आई ए राजा यांच्या नेतृत्वामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक व  कर्मचाऱ्यांनी कोकण पूरग्रस्त लोकांसाठी पिंपळगाव काळे येथील बाजारांमध्ये व आसलगाव येथील बाजारांमध्ये सर्व छोटी-मोठी दुकानदार भाजीपाला वाले हॉटेल वाले स्वीट मार्ट वाले इत्यादी सर्व लोकांकडे मदतीची मागणी केली व लोकांनीसुद्धा या मदतफेरी ला प्रतिसाद देत भरघोस निधी दिला . संस्थेचे संचालक कयूम दादा पटेल यांनी या मदत निधी मध्ये विशेष भर टाकली. जमा झालेला निधी आर टी जी एस द्वारे मुख्यमंत्री सहायता निधी  खात्यामध्ये जमा करून उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत सदर निधी हस्तांतरित करण्यात आला.

Previous Post Next Post