जळगांव जामोद विविध कार्यकारी सह.सोसायटी मधुन बुलडाणा जिल्हा केन्द्रीय सह.बॅंकेवर प्रतिनिधी म्हणून कैलासबाप्पु देशमुख यांची अविरोध निवड..


जळगांव जामोद प्रतिनिधी:-

जळगाव जामोद येथे दिनांक 28 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद विविध कार्यकारी सहकारी संस्था ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेमध्ये विविध कार्यकारी सोसायटी वर प्रतिनिधी म्हणून एकूण सहा सदस्यांची निवड या सभेमध्ये करण्यात आली. सदर प्रतिनिधींची निवड  अविरोध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँक बुलढाणा वर प्रतिनिधी म्हणून कैलास अजाबरावबाप्पू देशमुख यांची अविरोध निवड करण्यात आली. जिल्हा देखरेख सहकारी संस्था बुलढाणा वर अनिल कृष्णराव अंबडकार यांची अविरोध निवड करण्यात आली. जिल्हा सहकारी बोर्ड बुलढाणा अरुण तुकाराम खिरोडकार यांची अविरोध निवड करण्यात आली. जिनिंग-प्रेसिंग सहकारी संस्था जळगाव जामोद मनोहर केशव मांडेकर संजय गांधी सहकारी सूतगिरणी जळगाव जामोद यावर प्रतिनिधी म्हणून सुभाष रामभाऊ बोंबटकार यांची अविरोध निवड करण्यात आली वरील सर्व नियुक्तीच्या वेळेस आम सभेमध्ये एस,एन,हेलोडे प्रशासक,व्हि,जे तायडे शाखा सचिव, व्हि,एस,भड सचिव, एस,सी,धुर्डे कर्मचारी, माजी नगराध्यक्ष रामदास बंबटकार, माजी नगरसेवक अशोक नानग्दे,अनिल हातेकर,सुधाकर घाटे,संजय गिरजापुरे,बाळु इंगळे,गजानन काथोटे, गजानन डोबे,गजानन नागपुरे,गजानन मानकर, पत्रकार देविदास तायडे, अर्शद इक्बाल, मंगेश राजनकार, तथा बहुसंख्येने सभासद यावेळी उपस्थित होते. विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे आमसभा शांततेत पार पडली यावेळी सर्व सदस्य तसेच निवडून आलेल्या प्रतिनिधींना चहापाना ची व्यवस्था करण्यात आली होती.

Previous Post Next Post