खिरकुंड मार्डी मार्गावरील पूल शिकस्त शासनाचे दुर्लक्ष....


 राजु भास्करे /अकोला जिल्हा प्रतिनिधी 

आकोट तालुक्यातील आदिवासी भागातील तसेच सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या ग्राम मार्डी खिंरकुड  मार्गावरील  शिव नाला मोठ्या प्रमाणात  शिकस्त झाला असुन या पुलावरून वाहन धारकांना आपला जिव धोक्यात घालून वाहन काढत असुन या ठिकाणी हा पुल मोठ्या अपघातास निमंत्रण देत असुन या समस्ये बाबत शासनाचे दुर्लक्ष दिसत आहे गेल्या  दोन वर्षी पासून या पुलाची अशा प्रकारे दुर्दशा झाली आहे तरी मात्र शासनाने या पुलाची कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्याने या ठिकाणी एखाद्यावेळेस मोठा अपघात होऊ शकतो तरीसुद्धा या पुलाकडे  शासनाचे दुर्लक्ष असून  हा मुख्य रस्ता असून  या रस्त्यावरील पाच ते सहा गावचा संपर्क आहे येथुन   जवळच असलेले खिंरकुड धरण  हे निसर्गरम्य  वातावरण  आहे हे धरण पाहण्यासाठी जातांना नागरीकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे हा प्रकल्प आदिवासी  भागात  असून  सातपुड्याच्या पायथ्याशी  असल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरिक येतं  असतात  खिंरकुड  म्हणून ओळख असलेले हे धरण   व या रोडवरील जड वाहतूक  जोरात सुरू असून  येथील या  पुलाखालील नाली  ची पाइप  पुरामुळे  वाहून गेले  आहे  तरी येथील नागरिकांनी  ट्रक वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न  अनेकवेळा केला आहे  या आधी  रुईखेड ते वस्तापुर या रोडवरून  हेच वाहतूक होत होती  आता तो रस्ता खराब झाल्यामुळे  कोथरूड येथील दोन नाले  पुराणे वाहून गेले  व तो रस्ता  बंद झाला  तर आता या ट्रक वाहनांनी हा किरकोळ मार्ग स्वीकारला   व आता  या रस्त्याचीही  दुर्दशा  झाली आहे  हे मोठमोठे टिप्पर  बंद करण्याची  मागणी येथील छोटे छोटे वाहन चालकांची व गावातील नागरिकांची आहे.

Previous Post Next Post