आर्य समाज पथ्रोट तर्फे श्रावणी पर्व वेदप्रचार सप्ताहाचे आयोजन केले असता त्याचे समापन यादव वंशीय कुळातील गवळी समाजाची वस्ती असलेल्या डोंगराळ भागातील उपातखेडा येथे पंचकुंडीय महायज्ञ, ग्रामपंचायत सरपंच सदस्यांच्या सत्कार समारंभा सह गोपाळकाल्याच्या महाप्रसादाने झाले. संपुर्ण गावात भगवे ध्वज व पताकाने गाव सजल्याने संपुर्ण उपाातखेडाा गाव भगवेमय झाले होते. सत्य सनातन वैदिक धर्माचे वैज्ञानीक मर्म, पर्यावरण शुद्धी व कल्याणकारी शिवतत्वाचे शुद्ध स्वरुप उच्च कोटिच्या विद्वानाद्वारे सहजतेने ज्ञान सर्वसामान्याना समजावे. गायत्री यज्ञाच्या पुण्यप्राप्तीकरीता परमात्म्याची वेदवाणी घरोघरी पोहण्यासाठी व कोरोना महामारी निवारनार्थ रक्षाबंधन ते गोकुळअष्टमी ३० आॅगस्ट पर्यंत आर्य समाज मंदिर सह परिसरातील घरोघरी यज्ञ हवन झाले, गायत्री महायज्ञाची पुर्णाहुती सांस्कृतीक भवन उपातखेडा येथे दि. ३१ आॅगस्ट २०२१ मंगळवारी भजनोपदेशीका साध्वी यशोदाजी आर्या, पं.बाबुराम आर्य बदायुँ उ.प्र., संस्कृत अनुवादक नारायणरावजी कुळकर्णी नांदेड यांच्या ब्रम्हत्वाखाली महायज्ञ पार पडले.जिल्हा भाजपा उपाध्यक्ष सुधीरभाऊ रसे, उपसरपंच अतुल वाठ, सागर मामनकर, जयरामभाऊ खडखे, गणपतभाऊ खडके, गजाननभाऊ येवले, उपातखेडा येथील ग्रामस्थ उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता अशोक नागे, योगेश्वर सोनार, किशोर खडके मधु शनवारे राजु रसे,भालचंद्र ठाकरे यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संयोजक नितीन दुरबुडे व प्रधाण शरदराव कोसरे होते.
उपातखेडा झाले भगवामय.श्रावणी पर्व वेदप्रचार सप्ताहाचे समापन...
राजु भास्करे /चिखलदरा