कोरोना महामारी मुळे राज्यात सर्वत्र मागील मार्च २०२० पासून इयत्ता १ ते ७ चे वर्ग बंद असल्याने विध्यार्थ्यांचे शैक्षनिक नुकसान होत असल्याने त्वरित शाळा सुरु करण्याबाबत चे निवेदन शिक्षक परिषद कडून तहसीलदार मार्फत मुखमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने कोरोना महामारीच्या नियमाला अनुसरून राज्यातील प्राथमिक शाळा सुरु कराव्यात अशी मागणी अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या धारणी तालुक्यातील शिक्षक परिषद या संघटनेने तहसीलदार अतुल पटोले यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेयांना एका निवेदनाव्दारे केली आहे.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता आँनलाईन शिक्षण यशस्वी होणे शक्य नाही.नेटवर्क समस्यामुळे ग्रामीण व गरीब पालकांना परवडणारे नसल्याने आँनलाईन शिक्षणाच्या नावाखाली या लहान विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक शिक्षण पाया असून शिक्षणाचा पायाच ठिसूळ होत असल्याचे चित्र आहे. कोरोना महामारीच्या नियम व अटीनुसार इयत्ता ८ ते १२ वि चे वर्ग ग्रामीण भागात सुरु आहे. यामुळे ग्रामीण क्षेत्रात कोरोना वाढत असल्याचे चित्र दिसून येत नाही त्या अनुसंगाने इयत्ता १ ते ७ वी चे टप्प्याने वर्ग सुरु करण्यास हरकत नसल्याचे सुध्दा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे हे थांबविण्यासाठी प्राथमिक शाळा सुरु कराव्यात अशी मागणी केली जात आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अमरावती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रभुदास बिसंदरे, जिल्हा कार्यवाह रवींद्र घवळे, शिक्षक बँकेचे संचालक तथा जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चौकसे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज कांदे, परिषदेचे धारणी तालुका अध्यक्ष संजय गंगराडे, तालुका कार्यवाह प्रशांत रोहणकर, तालुका कार्याध्यक्ष विजय जावरकर, तालुका उपाध्यक्ष गोविंद फुलमाली, तालुका उपाध्यक्ष उमेश पटोरकर, कार्यकारिणी सदस्य उमेश आकोडे, तालुका कोषाध्यक्ष राजेश खाडे, संघटक रवींद्र मालवीय उपस्थित होते.
शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्याना निवेदन.शिक्षक परिषद धारणी यांनी घेतली तहसीलदार यांची भेट...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी