दर्यापुर तालुक्यातील थिलोरी येथील रहिवासी भीमराव चव्हाण यांच्या घरी बालपणापासुन शिक्षणाकरीता असताना रात्री झोपेत सर्पदंश झाल्याने रासेगाव येथे उपचाराकरीता आणत असताना वाटेतच मृृृृत्यु झाल्याची मन हेलावणारी घटना घडल्याने समाजमन सुन्न झाले. मिळालेल्या माहीतीनुसार भातकुली तालुक्यातील डाळी पाटण येथील सख्खे बहीणभाऊ दर्यापुर तालुक्यातील थिलोरी येथे आपल्या मावशीकडे दोघे शिक्षण घेत होते. गावामध्ये शिक्षण होणार नाही म्हणून आई-वडिलांनी पाठविले. मात्र शनिवार रोजी रात्री एकच्या सुमारात अचानक घरामध्ये साप आला पवन बाळू चव्हाण वय १९ , स्वाती बाळू चव्हाण वय १३, या बहीण भावंडााना सापाने चावा घेतला. सर्पदंश झाल्ययाची माहीती घरच्यासह शेजार्याना समजताच त्यांनी तातडीने दोघाना दर्यापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. परंतु त्या ठिकाणी उपचार न झाल्याने अचलपुर तालुक्यातील रासेगाव येथील सर्पदंश उपचार करीता प्रसिद्ध असलेल्या उपचार केंद्र येथे आणत असताना दुर्दैवाने रस्त्याने बहीण-भावांचा मृत्यू झाला. दोन्ही शव शवविच्छेदनाकरीता अचलपुर उपजिल्हा रुग्णालयात आणुन उत्तरिय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.भातकुली तालुक्यातील डाळी पाटण येथे दोघावर अंतीम संस्कार करण्यात आले असता संपुर्ण ग्रामस्थांचे मन हेलावले.एकुलत्या एक मुलगा व मुलींच्या दुखद निधनाने आईवडील निपुत्रीक झाले. घटनेने संपूर्ण गावात दुखवटा असुन काळाने सख्या बहीणभावावर एकाच वेळी झडप घातली
बहीणभावांचा सर्पदंशाने मृत्यु.मावशी कडे होते शिक्षणाला धक्कादायक घटना.गावात हळहळ...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी