हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
हिवरखेड परिसरात १० दिवशीय गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो व यावर्षी सुद्धा भाविकांनी १०, दिवस ज्या बाप्पाची मनोभावे सेवा केली अशा लाडक्या बाप्पाला अनंतचतुर्थीला आखरी निरोप दिला ,अनेक भक्तांनी साध्या पद्धतीने आपल्या घरघुती बाप्पाला मानाने आरती करून हिवरखेड येथील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या धबधबा खारशावर विसर्जन करण्यासाठी नेले ,या मध्ये अनेक महिला भाविकांनी व चिमुकल्यानि हजेरी लावली धबधबा खारशा हे हिवरखेड नजीक व निसर्ग रम्य संस्थान असल्याने आणि विशेष म्हणजे येथे वाहते पाणी व बाराही म्हणीने वाहणारे अमृत् कुंड असल्याने भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला खारसा येथे विसर्जनाला अधिक पसद्दी दिली, अमृत कुंडातुन वाहत असलेल्या पाण्याला पाहून चिमुकल्याचा मोह आवरल्या गेला नाही आणि थोड्या थोड्या पाण्यात अनेक चिमुकल्यानि मनसोक्त आंदत घेतला, कोरोनाचे नियम पाडत सर्व भाविकांनी गर्दी न करता मागे पुढे गणेश विसर्जन करून बाप्पाला निरोप दिला, आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या हाताने पाण्यात विसर्जन करतांना अनेक भाविकांची मने भरून येत होती गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या अशा घोषणात गणरायाला हिवरखेड भक्तांनी निरोप दिला,तर उपस्थित भाविकांनी ऋषी महाराज संस्थान दर्शनाचा लाभ घेतला,