नगराध्यक्षांनी नगर विकासाची ९० टक्के विकास कामे पूर्ण करून दिलेल्या शब्दाला जागल्या"--आमदार डॉ. संजय कुटे..


 जळगाव(जामोद)प्रतिनिधी:-

दिनांक २४ सप्टेंबर रोजी ५ कोटी रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी त्यांनी जळगाव जामोद नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सीमाताई डोबे आणि  सहकाऱ्यांनी  पाच वर्षात नगर विकासाचा फार मोठा अनुशेष दूर करून शहरातील सर्व मूलभूत सुविधांसह विकास कामे करु, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी शहरातील सर्व रस्ते, नाल्या, गटारांची कामे ,चौकाचौकांत सौंदर्यीकरण, शाळा इमारती, व्यायाम शाळा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका शहरांमध्ये   भाजी मार्केट चे नूतनीकरण ,सामाजिक सभागृह, स्मशानभूमी विकास, शहरातील स्वच्छतागृहांचा विकास, आदी सर्व कामे ९० टक्के पूर्ण करून जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली. त्यामुळे नगराध्यक्ष आणि त्यांची त्यांची सहकारी टीम कौतुकास पात्र आहे, असे गौरवोद्गार भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे यांनी काढले. ते दिनांक २४ सप्टेंबर रोजी नगर परिषदे अंतर्गत पाच कोटी रुपयांच्या शाळा इमारती लोकार्पण, सभागृह लोकार्पण व विविध विकास कामांचे लोकार्पण प्रसंगी बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.सीमाताई डोबे ह्या होत्या. ह्या कार्यक्रमासाठी  माजी नगराध्यक्ष मांगीलाल भंसाली, माजी नगराध्यक्ष रामदास बोंबटकार,  न प सभापती सौ सविता कपले, सौ. रत्नप्रभा खिरोडकर, सभापती सौ उषाताई धंदर,श्रीमती नलूताई भाकरे, आशिष सारसर यांच्यासह भाजपा जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर अग्रवाल ,भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सौ.लताताई तायडे, निलेश शर्मा, शैलेश बोराडे,शहर अध्यक्ष अभिमन्यू भगत, महिला शहर अध्यक्ष शिल्पा भगत,नगरसेविका सौ.रत्नप्रभा खिरोडकर,सौ.जयमाला इंगळें, बारहाते ताई,  राम इंगळे, प्रा राजेश गोटेचा,शाकिर खान, उमेश येउल, डॉ प्रकाश बगाडे, गोटू खत्ती, कैलास पाटील, सुरेश इंगळे, अरुण खिरोडकार, शरद खवणे,रमेश कोथळकार, पांडुरंग मिसाल, यांच्यासह नगर पालिका शिक्षक,कर्मचारी वृंद, भाजपा पदाधिर्यकर्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

Previous Post Next Post