हरिसाल येथे वनशहीद दिन साजरा..


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

मेळघाट व्याघ्र प्रकलपांतर्गत गुगामाल वन्यजीव विभाग मार्फत  वनपरीक्षेत्रं हरिसाल येथे वनाची सेवा करताना शहिद झालेले त्र्यंबकराव भीमरावजी भारती वनपरीक्षेत्राधिकारी,नाझिर मोह्म्मद वनपरीक्षेत्राधिकारी व आभिष रमेशराव वाकोडे वनरक्षक या  वीर वनशहीदाना व  त्यांच्या स्मृतीस्मारकास वंदन करून त्यांना हरिसाल येथे श्रद्धांजली अर्पण करून वनशहीद दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी वनपरीक्षेत्रातर्गत सर्व वन कर्मचारी वनपाल यामध्ये महाराष्ट्र वनपाल,वनरक्षक संघटना नागपूर चे अध्यक्ष श्री.नितीन बारसकर,व इतर श्री. हरसूले श्री. सतीश गिरगुणे,तसेच वनरक्षकगायकवाड, कांबळे, अलोककार कु. बिसेन, कु. पुंडकर, कु. डिमरीकर, कु.गीता कासदेकर तसेच सर्व  वनमजूर सुरते बिलवे, व इतर सर्वांनी वनशहीदांना श्रद्धांजली अर्पण करून सलामी दिली.

Previous Post Next Post