हिवरखेड ऋषी महाराज संस्थानवर ऋषी पंचमी साजरी,कोरोनाचे नियम पाळून महाप्रसाद वितरित,


हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड येथील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले ऋषी महाराज संस्थान धबधबा खारसा या नावाने ओळखले जाते, येथे विविध देवी देवतांच्या  मुर्त्या  विराजमान आहेत, येथे आसरा माता, शिवलीग ,नंदीकेश्वर,श्री गणेश , बजरंबली, तुळस,मोठं मोठे वटवृक्ष, आणि विशेष म्हणजे  बाराही महिने वाहणारा अमृत कुड आहे असे हे ऋषिमहाराज संस्थान आहे, येथे ऋषीपंचमी निमित्त ऋषीमहाराज संस्थानवर विशेष पूजा, होमहवन पूजा विधी करून महाप्रसादाचे वितरण केले, भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून अनिल कराळे,रामेश्वर शिंगणे,उमेश कोल्हे,अशोक अस्वार, उमेश शेळकें, महेंद्र कुऱ्हाडे, रमेश व्यवहारे, थोरात महाराज,सुनील भगत,आत्माराम पांडे,मनोहर महाराज धुरदेव, आधी भाविकांनि परिश्रम घेतले,

Previous Post Next Post