जळगांव जामोद तालुक्यातील कुरणगाड खुर्द येथील शिपाई शिवाजी कोकाटे यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्य संतोष घोंगे यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार केली आहे या तक्रारीत म्हटले आहे की मासिक मिटिंग सुरू असतांना मागिल सरपंच यांच्या कार्यकाळात कोणकोणते कामे झाली व काही अपुर्ण कामाबाबत चर्चा सुरु असताच शिपायाने अचानक मला मारहाण केली व माजी सरपंच माझे काका होते त्यांच्या संदर्भात कोणतिही चर्चा करू नका नाहीतर मी कोणालाच सोडणार नाही असे म्हणुन धमकी दिली तसेच हा शिपाई रोजगार सेवक व ग्रामपंचायत शिपाई असुन एकच व्यक्ती दोन दोन पगार घेतो याला जबाबदार कोण आहे किंवा कोणाच्या सांगण्यावरून ह्या व्यक्तीला दोन दोन पगार दिल्या जातात असे तक्रार अर्जात नमूद केले आहे पुढे निवेदनात म्हटले आहे की या दोन जागेवर एकच व्यक्ती काम करत असल्यामुळे गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणाला रोजगारापासुन वंचित न ठेवता त्या ठिकाणी एक युवकाला आतापर्यंत का लावले नाही असे तक्रार कर्ते ग्रामपंचायत सदस्य संतोष सखाराम घोंगे व उपसरपंच सौ शारदा उल्हास झाटे, ग्रामपंचायत सदस्य सौ उषा शंकर राठोड,ग्रा,पं,सदस्य सौ नंदा एकनाथ वडोदे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,यांच्या तक्रारीवर सह्या सुद्धा आहेत
शिपायाने केली ग्रामपंचायत सदस्यास मारहाण आणि एकच शिपाई घेतो दोन दोन पगार...
जळगांव जामोद प्रतिनिधी;-