राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
कोरोना काळात कोविड रुग्णालयात स्वताच्या जिवाची पर्वा न करता अमरावती जिल्ह्यातील बेरोजगार डॉक्टर, परिचारिका सह इतर कर्मचाऱ्यांनी सेवा दिली,मात्र कोरोनाची दुसरी लाट संपताच कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या१३८६कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले, त्यांनी अविरत दीड वर्ष कोरोना मध्ये सेवा दिला मात्र अचानक कामावरून काढल्याने या कर्मचाऱ्यावर उपासमार आली,त्यामुळे येणाऱ्या शासकीय पद भरती समाविष्ट करण्यात यावे,व आता रुग्णालयात समाविष्ट यावे मागणीसाठी अमरावतीच्या इर्विन चौकात कोविड योद्धा कर्मचारी आमरण उपोषनास बसले आहेत,गेल्या तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही,तर आज दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले,