हिवरखेड मध्ये गरजूं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित,बाल गणेश उत्सव मंडळाचा उपक्रम,


 हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड ओंम नगर पेठपुरा येथे नव्याने सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे बाल गणेश उत्सव मंडळची निर्मिती झाली असून या मंडळाने पहिल्याच वर्षी गोळा झालेल्या वर्गणीतून आणि दानशूर दात्याच्या माध्यमातून आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित केले, तसेच परिसरात अनाथ विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणासाठी सज्ज केले  ,या मधील दानशूर दात्यांनी २ अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले  तर पवन महाराज सोनोने यांच्या मार्गदर्शनातुन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कलाची शिकवण देण्यात आली, यावेळी सत्काराचा कार्यक्रम पार पडला उपस्थित टाळे महाराज, तायडे सर, गणेश अग्रवाल ,महेंद्र भोपळे,प्रवीण येऊल, शंकर महाराज देशमुख, भड सर,गिर्हे सर, टेलर सर,अढाऊ ,इगळे,आधी दानशूर व्यक्ती हजर होते,

Previous Post Next Post