कृषीदूता मार्फत ई पीक पाहणी मार्गदर्शन...


 जळगाव जामोद :--

ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थी संकेत जयदेवराव वानखडे मार्फत शेतकऱ्यांना पीक पाहणी बद्दल योग्यरीत्या मार्गदर्शन करण्यात आले.सदर मार्गदर्शना मध्ये शेतकऱ्यांनी व्यवस्थितरीत्या पीक पाहणी कशी करावी हे सांगण्यात आले. राज्य सरकारने 15 ऑगस्टच्या अमृत महोत्सव पासून ई पीक पाहणी हे एप्लीकेशन अमलात आणली यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाची पाहणी ही स्वतः आपल्या शेतात जाऊन मोबाईल द्वारे करायची आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अजून सुद्धा याबद्दल पुरेशी माहिती मिळालेली नाही.पुरेशी माहिती नसल्याने आणखी सुद्धा अनेक शेतकऱ्यांची पिक पाहणी बाकी आहे त्यामुळे या विद्यार्थ्याकडून हे ॲप्लिकेशन कशाप्रकारे वापरावे,तसेच सदर माहिती कशाप्रकारे भरावी, कशाप्रकारे पिकाची पाहणी करावी,कशाप्रकारे आपले पीक नोंदवावे,तसेच पड क्षेत्र कसे नोंदवावे याचे संपूर्ण मार्गदर्शन यामध्ये करण्यात आले. यावेळी शेतकरी संजय जाधव, उत्तम सुरडकर, नारायण वसतकार, विवेक जाधव, प्रभुदास बोंबटकार, काशीराम बोंबटकार इत्यादी शेतकऱ्यांची उपस्थिती होती तसेच सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले.सदर कार्यक्रमा करिता गावातील शेतकरी तसेच सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्याकरिता स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील प्राचार्य वाय.आर.गवई उपप्राचार्य एस. एस.धर्माल कार्यक्रम अधिकारी पी.एस.वानखडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous Post Next Post