अतिदुर्गम व मागासलेल्या मेळघाट विभागामधे गौहर हसन IPS यांनी नुकताच पदभार स्वीकारला असल्याने सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या नियुक्तीमुळे आनंद व्यक्त होत आहे.महाराष्ट्र गवळी समाज संघटना धारणी शाखेचे पदाधिकारी सदाशिवराव खडके,प. स. उपसभापती जगदीश हेकडे,पत्रकार ज्ञानदेव येवले व रामदास भाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे.स्वागत स्वीकारून त्यांनी आपल्या कार्यालयातील विविध विभागाची माहिती घेतली. व इमानदारी व निष्ठेने कार्य करण्याबात पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना कानमंत्र दिला.या पूर्वीही धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निकेतन कदम आय. पी. एस.अधिकारी होते त्यादरम्यान धारणी व परिसरातील तसेच मध्यप्रदेशाच्या सीमेतून होणारी सर्वच अवैध बंद झाले होते.त्यामुळे गौहर हसन यांनी समन्वयातून काम करण्याच्या पद्धतीवर फोकस करत मेळघाट मध्ये शांती व सुव्यवस्था अबाधित ठेऊन अवैध बाबीना पूर्णपणे लगाम लावल्या जाईल,असे त्यांनी सांगितले. पोलीस विभाग एकटा काही करू शकत नाही त्याकरिता समाजाने पोलिसांच्या सोबत समन्व्यय ठेऊन राहणे गरजेचे आहे.असेही गौहर हसन यांनी चर्चेदरम्यान म्हटले.
गौहर हसन (IPS)यांनी स्वीकारला धारणीचे एसडीपीओ चा पदभार...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
