नयाखेडा येथील ९ वर्षीय रुद्राक्षचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू...


 राजु भास्करे/चिखलदरा.

अचलपूर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या गाव नयाखेडा येथे आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी येथिल महिला शेवन्ती सुरेश अखंडे वय ४० वर्षे ही आपल्या दोन लेकरांनसह शेतात कामाला गेली होती.दुपारी  1 वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह  पावसाला सुरवात झाली असता सेवन्ती ही आपल्या दोन मुलासह शेतातील झोपडी मध्ये गेली असता अचानक विजेचा कडकडाटासह विज सेवन्ती चा मुलगा रुद्राक्ष सुरेश अखंडे 9 वर्षे याच्या अगांवर पडली असता याचा जागीच मृत्यू झाला असुन सेवन्ती सुरेश अखंडे ही गभिंर जखमी असल्याचे समजते.तिला अचलपूर येथिल उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. व मुलगी कीर्तीका सुरेश अखंडे 6 वर्षे हिच्या पायाला ईजा झाली आहे. या घटनेमुळे नयाखडा येथे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post Next Post