राष्ट्रीय चर्मकार महासंघ वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळ वाटप...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बबनरावजी घोलप साहेब, माजी समाज कल्याण मंत्री यांच्या आदेशानुसार व राज्य उपाध्यक्ष मा. दादासाहेब काटकर आणि अमरावती विभागीय अध्यक्ष मा. प्रा. डि. आर. माळी सर यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक  "२४ सप्टेंबर रोजी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाच्या नियमांचे पालन करुन"रुग्णांना फळे व बिस्किटे वाटपाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव इंगळे, जिल्हा सचिव सुखदेवराव थोटे, जिल्हा सल्लागार अँड रविंद्र काकडे, शहर अध्यक्ष नागेश भटकर,जिल्हा संघटक रामदास पिंजरकर, विवाह मंडळ जिल्हाध्यक्ष तथा से. नि. प्राचार्य गजानन दांडगे सर, युवा आघाडी जिल्हा सचिव संदिप इंगळे, तालुका अध्यक्ष गजानन माटे, नगर सेवक विजय तांदळे, गुरू रविदास सत्यशोधक मासिकाचे जिल्हा संयोजक रविंद्र शेकोकार , जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. केदार यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post