हिवरखेड गावाची लोकसंख्या मोठी असून गावात विविध व्यवसाय मोठे आहेत,गावात मोठं मोठी शाळा कॉलेज आहेत, परंतु पाहिजे तसा गावाचा विकास होत नसल्याने आणि ग्रामपंचायत विकास कामाच्या कोसोदूर असल्याने हिवरखेड येथील जनता जागरूक होऊन आता गावाचा विकास आम्हीच नगरपंचायत आणून करू,असा निर्धार गावकऱ्यांनी घेऊन गावातील जागरूक नागरिकांनी स्वाक्षरी अभियानाला सुरुवात केली आहे,तसेच गावात नगरपंचायत व्हावी या करिता बऱ्याच दिवसांन पासून गावकरी वेगवेगळे आंदोलने करत असून शासनाला मात्र जाग येत नाही,काय शासनाला आता आमचा बळी हवा का? असा सवाल येथे निर्माण होतो,आणि हे शासन नगरपंचायत न व्हावी अशा राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करून नगरपंचायत करत नसेल तर ही बाब लाजिरवाणी ठरेल अशी सुद्धा चर्चा नागरिक करीत आहेत, गावातील समस्त जनता एकीकडे महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालून साध्या पद्धतीने मूक मोहीम,स्वाक्षरी अभियान उपोषण असे वेगवेगळे आंदोलने नगरपंचायत होण्याकरिता गावकरी राबवित आहेत, तर दुसरीकडे गावकऱ्यांनी ज्यांना नगरपंचायत करण्यासाठी निवड करून दिली तेच ग्रामपंचायतचे पदाधिकारी नगरपंचायत न व्हावी असा कुचिल डाव करून ग्रामसभेत ठराव घेतात आणि त्याला मान्य करण्यासाठी मुबई मंत्रालया पर्यत धाव घेतात अशा या ग्रामपंचायत पदाधिकार्यांच्या वागण्याने गावातील जनता निराश झाली असून जनताना नगरपंचायत करण्याचा विळा उचला व जिथपर्यंत शासन हिवरखेड नगरपंचायत करत नाही तिथपर्यंत आम्ही गप्प बसत नाही असा संकल्प गावकऱ्यांनी घेतला व दिनांक २६ सप्टेंबरच्या दुपारी ५ वाजता हिवरखेड बस्थांक पासून जागरूक नागरिकांनी स्वाक्षरी अभियानाला सुरुवात केली ,अनेकांनी २ तासातच नागरिकांनी आपल्या स्वाक्षऱ्या नोंदविल्या आणखी स्वाक्षरी सुरूच आहेत,ह्या स्वाक्षरी वरिष्ठ शासनाकडे पाठविण्यात येतील शासनानि नागरिकाच्या स्वाक्षरीची दखल घेऊन त्वरित हिवरखेड नगरपंचायत होण्याची घोषणा करावी आणि दोन ग्रामपंचायत करण्याचा ठराव रद्द करण्यात यावा आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री बचुकडू यांनी सुद्धा नगरपंचायत करण्याचे गावकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी हिवरखेड येथील ४० हजार लोकसंख्या करीत आहे,स्वाक्षरी अभियान राबविण्याकरिता दिनांक २६ च्या सध्याकाळी चंडिका चौक मरी माता मंदिरात नारळ फोडून स्वाक्षरी अभियानाला प्रारंभ करण्यात आला गावातील वार्ड नंबर चार भिम नगर आणि वार्ड नंबर २ इंदिरा नगरातील आम नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर आणखी वार्डातील स्वाक्षऱ्या घेणे सुरू राहील या स्वाक्षरी अभियानाला उत्तम वनकर, सागर उरकडे,धीरज बजाज,जिया पठाण,शाहरुख लाला, अब्दुल साकीब, महेंद्र बांगर, गौरव ओंकारे, गणेश मानकर,श्याम ओंकारे,मंगेश ओंकारे,अर्जुन खिरोडकार आधी जागरूक नागरिकांनी यशस्वीपणे अभियान पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला आहे,
हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्यासाठी स्वाक्षरी अभियान,गावातील जनतेने जागरूक होऊन राबविले हे अभियान,
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
