जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये एक असणारी ग्रामपंचायत आसलगाव ग्रामपंचायत येथे ४ सप्टेंबर रोजी संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून संतांचे महाराष्ट्र राज्याच्या ला घडविण्यासाठी संतांचे फार मोठे योगदान लाभले आहे, अशाच थोर संतान पैकी एक म्हणजे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची काल दिनांक ४ सप्टेंबर रोजी आसलगाव ग्रामपंचायत मध्ये पुण्यतिथी निमित्त आसलगाव ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी समाज बांधव यांच्या वतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली.याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच सुनील डीवरे, उपसरपंच गणेश गिरे, गोपाल टापरे, सुनील गिरी, विष्णू इंगळे, अंबादास निंबाळकर, सुनील येनकर, ज्ञानेश वानखडे, संजय तायडे सुनील डाबेराव ,रामदास चौधरी उमेश जावळे, अभिषेक चौधरी पप्पू जावळे, अभय तांदूळकर उपस्थित होते
आसलगाव ग्रामपंचायत मध्ये श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी साजरी...
जळगांव जा.प्रतिनिधी:-