जळगाव जामोद मधून जिल्ह्यातील पहिला रणजी खेळाडू घडतो त्या जळगाव मधून विदर्भ संघ तर सोडाच पण बुलढाणा जिल्हा संघासाठी गेल्या 10 वर्षात जळगाव जामोदमधून खेळाडू घडू नये याबद्दल जिल्हा संघटनेचे सचिव चंद्रकांत साळुंके यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज येथील एम्स क्रिकेट अकादमी ला भेट देवून खेळाडूना मार्गदर्शन करताना साळुंके बोलत होते.यावेळी त्यांनी खेळाडूंना मौलीक माहिती देताना जास्तीत जास्त सराव सामने खेळून आपला नावलौकीक वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहावे असे आवाहन केले.यावेळी एम्स क्रिकेट अकादमीचे संचालक जाफरखान अमानुल्लाह खान, आर सी 24 न्यूज चे संचालक राजेश बाठे, आनंद सर व,साहिलभाले, आयुष राऊत, किर्तेशअग्रवाल,प्रबुद्ध इंगळे, रोहित निमकरडे, सोहम वराडे,आकाश भुते, निखिल खंडारे, आर्यन बकाल, प्रणव चोपडे, हर्ष चौधरी,रोशन बोडदे, दीप वावगे,निखिल राऊत,हर्ष पलन, हर्ष बनाईत हे खेळाडू यावेळी उपस्थित होते.
शिक्षकदिन निमित्ताने श्री चंद्रकांत साळुंके यांची जळगाव जामोद एम्स क्रिकेट अकादमीस भेट..
जळगांव जा.प्रतिनिधी:-